“मसाले” ! प्राचीन काळापासून ते आजतागायत भारतीय संस्कृतीची असणारी ओळख. भारतीय खाद्यसंस्कृतीचा आणि भारतीय ‘जेवण’शैलीचा अनोखा मिलाफ म्हणजेच, वेगवेगळया औषधी आणि नैसर्गिक वनस्पतींच्या मिश्रणातून घरगुती पद्धतीने बनवले गेलेले मसाले. याच मसाल्यांनी पाश्चिमात्य व्यापाऱ्यांना घातलेली भुरळ त्यांना हजारो मैलांपासून भारतापर्यंत खेचून घेऊन आली, भारतीय मसाल्यांनी अक्षरशः जगावर किंबहुना आहारशैली वर हुकूमत गाजवलेली आहे. याच मसाल्यांच्या व्यापारासाठी पोर्तुगीजांपासून ब्रिटिशांपर्यंत सगळे पाश्चिमात्य भारतात आले, किंबहुना वास्को दि गामा हा प्रामुख्याने याच कारणासाठी समुद्र मार्गाचा शोध घेत भारतापर्यंत पोहोचला आणि कोलंबस अमेरिकेपर्यंत. थोड्या गमतीने असेही म्हणता येईल कि ‘अमेरिकेचा शोध लागण्यामागेही भारतीय मसाल्यांचाही हात होताच’.
इंटरनेट च्या आजच्या जमान्यात संपूर्ण जग एक वैश्विक खेडं म्हणून उदयाला आलेलं आहे. प्रत्येक देशांच्या आणि प्रांतांच्या संस्कृतीचा मिलाफ आज घडून आलेला दिसतो आणि ह्याच कारणामुळे भारतीय मसाल्यांची मागणी जगभर वाढलेली आहेच, अगदी काही कामानिमित्त भारतात आलेल्या परदेशी पाहुण्यांपासून ते यु-ट्यूब ब्लॉगर पर्यंत प्रत्येकाने याचा प्रसार करून लोकप्रियता वाढवलेली आहे.
भारतीय मसाल्यांना आजही जगभरात तेवढीच मागणी आहे जेवढी प्राचीन काळी होती बहुधा त्यापेक्षाही ज्यास्तच, आणि त्याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या नैसर्गिक वनस्पतींची हाताने कुटून बनवलेली मिश्रणं. भारतातल्या प्रत्येक प्रांतात आणि घर घरात वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या वेगवेगळ्या मसाल्यांनी भारतीय संस्कृतीत आपली वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे आणि भारतीय खाद्य संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून आहे त्यांचा स्थान मानाचं आहे. आजही बहुतांशी भारतीय गृहिणी दैनंदिन वापरासाठीच मसाले घरच्या घरी हातानेच बनवतात आणि ह्याच कारणामुळे भारतीय मसाल्यांची ओळख टिकून राहिलेली आहे. कालानुरूप बदलत गेलेल्या आणि वेगवान जीवनशैली मूळे मसाल्यांची घरगुती निर्मिती करण्याचा कमी झालेला कल आणि वाढती मागणी याची सांगड घालण्यासाठी ‘सिद्धेश्वर फूड्स’ने आपल्या लोकप्रिय ‘राहुटी मसाले’ या ब्रँड च्या माध्यमातून वेगवेगळे मसाले बाजारात उपलब्ध केलेले आहेत. सिद्धेश्वर फूड्स मध्ये तयार केले जाणारे मसाले संपूर्ण घरगुती आणि नैसर्गिक पद्धतीनेच तयार केले जातात त्यासाठी कोणत्याही बाह्य संरक्षक रसायनांचा वापर केला जात नाही.
राहुटी
What We Really Do?
Vivamus accusamus, vel nam quisquam. Ipsa aliqua nostrum in cum ut fugiat penatibus cubilia cubilia.
Our Company Vision
Vivamus accusamus, vel nam quisquam. Ipsa aliqua nostrum in cum ut fugiat penatibus cubilia cubilia.
History Of Beginning
Vivamus accusamus, vel nam quisquam. Ipsa aliqua nostrum in cum ut fugiat penatibus cubilia cubilia.
आमचे मसाले किंवा चटणी तुम्हाला खरेदी करायचे आहे का ?
आमचे मसाले, शेंगा चटणी किंवा इतर उत्पादने केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर ते तुम्हाला अनेक प्रकारे आरोग्यदायी फायदे देखील देतात. आमची उत्पादने तुमच्या रोजच्या जेवणाला एक खास चव देतील ज्यामुळे तुम्ही तुमच्या जेवणाचा परमोच्च आनंद घेऊ शकाल व जेवण झाल्यावर तुमच्या मनात तृप्त झाल्याची भावना नक्कीच निर्माण होईल. आमचे मसाले, शेंगा चटणी किंवा इतर उत्पादने तुम्ही या वेबसाईट वरून सुद्धा खरेदी करू शकता.